प्रसन्न मनाचे फायदे...

यात मुळीच शंकेला जागा नसावी. श्री समर्थ रामदास स्वामींपासून अनेक संतांनी मनाची ताकद स्पष्ट केलेली आहेच. आणि आपल्याला इतकं सारं वाचायला वेळ नसतो म्हणून थोडक्यात प्रयत्न करूयात...

प्लासिबो हा शब्द तेव्हडया साठी खुप प्रसिद्ध. माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजारात त्याच्या मनाचाच ७५% हात असतो हे प्रयोगानं सिद्ध झालंय, ते अत्ता अत्ता. भारतीय विद्वानांनी ते कधीच ओळखून लिहूनही ठेवलंय आणि तेही खूप शतकं आधी. मराठीतून कळावं ह्या उद्देश्याने श्री समर्थ रामदासांनी विशेष प्रयत्न केले ते 'मनाचे श्लोक' ह्या मंत्रासाठी.

अख्खा २०५ श्लोकांचा एक मंत्र, फक्त मनासाठी... इतकी ताकद आहे आपल्या ह्या मनाची.

कोणतंही बाहेरचं म्हणजे ह्या शरीराबाहेरचं औषध, एखादा आजार बरा करण्यासाठी २५% काम करू शकतं, अगदी कितीही जहाल असलं तरीही. म्हणजेज मनाचं औषध जोडीला नसेल तर तो आजार बरा व्हायचं सोडाच पण अधिक तीव्र होत जातो.

हो बरोबर वाचलंत, शरीराबाहेरचं औषध... याचाच अर्थ असा कि आपलं शरीर स्वतः प्रत्येक प्रकारचं औषध लागेल त्या पद्धतीने, आवश्यक असेल अगदी तितकेच तयार करणारे रसायन केंद्र आहे. जर केंदाचा तज्ञ बुद्धीने श्रीमंत असेल तर बाहेरच्या औषधांची गरजच काय ? तज्ञ म्हणजे आपलं मन, हेच आपल्या ह्या रसायन केंद्राचे मुख्य चालक आहे.

आणि त्याची बुद्धी म्हणजे आपली स्मृती. स्मृती जितक्या आपल्या चांगल्या, तितकं मनही प्रबळ. म्हणून एखादा आजार झालाच तर त्या "आजारातून मी समूळ बरा होतोय" हे पहिलं औषध आधी घ्यायला हवं.

No comments:

Post a Comment